राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अपघाती निधन झाल्याने, त्यांची जागा कोण घेणार अशी चर्चा सुरू होती. अश्यातच राष्ट्रवादी पक्षाकडून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे. इतर सत्ताधारी पक्षांनी सुद्धा या मागणीला अनुकूलता दर्शविली असून लवकरच सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदी विराजमान होतील अशी खात्रीलायक बातमी आहे.

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे रिक्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवली जाणार आहे. शनिवारी होणाऱ्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत त्यांची एकमताने निवड केली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर लगेचच त्यांचा उपमुख्यमंत्री पदासाठीचा शपथविधी पार पडणार असल्याचे समजते.
नेतेपदाची निवड करण्यासाठी शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी औपचारिक निवड केली जाईल. निवडीनंतर पक्षाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तात्काळ निवडीचे पत्र सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडण्याची शक्यता असून, त्यांचा राज्य मंत्रिमंडळात तातडीने समावेश केला जाणार आहे. शपथविधीचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने पार पडणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांनी शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी पक्षाच्या वतीने सुनेत्रा पवार यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. सुनेत्रा पवार यांचा शपथविधी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या नियोजित कार्यक्रमानुसार पार पडणार असल्याचेही सांगण्यात येत आहे.
Mukesh Mohan Defamation Case: यूट्यूबर ‘मुकेश मोहन’ वर नितीन गडकरीकडून 50 कोटीचा मानहानीचा खटला दाखल.
Youtuber Mukesh Mohan faces legal action after publishing a video based on a report linked…
‘मी शंकर, तू पार्वती’ म्हणत स्वयंघोषित धर्मगुरू ‘ऋषिकेश वैद्य’ चा महिलेवर बलात्कार, ‘खरात’ नंतर नवीन प्रकरण समोर.
Vasai fake godman Hrushikesh Vaidya booked for rape and blackmail; Pune connection under investigation. (Image-…
Atrocities Act: अॅट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची घोषणा.
Atrocities Act New Rules: अॅट्रॉसिटी कायद्यात महाराष्ट्र राज्य सरकारने एक अत्यंत महत्वपूर्ण बदल केला आहे….
‘Shame On Team India’, ‘टीम इंडियाला लाज वाटली पाहिजे’ सूर्यकुमारने टी-२० विश्वचषक ट्रॉफी हनुमान मंदिरात नेल्याने कीर्ती आझाद यांची टीका..
(Team India Trophy Controversy) टी-२० विश्वचषकाच्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवने ट्रॉफी हनुमान मंदिरात…
Mamata Banerjee on Droupadi Murmu protocol row: “राष्ट्रपतींचा आदर; मात्र वर्षातून ५० वेळा येणार असतील तर प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहणं शक्य नाही” ममता बॅनर्जींची तीव्र प्रतिक्रिया
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या बंगाल दौऱ्यावरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची तीव्र प्रतिक्रिया. Mamata Banerjee on…
Trump Allows India to Buy Russian Oil for 30 Days: भारताला ३० दिवस रशियाकडून तेल खरेदी करण्यास अमेरिकेची तात्पुरती सूट
US to temporarily allow India to import Russian oil for 30 days. दिल्ली: (Trump Allows…


