RSS Chief Mohan Bhagwat Statement: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) सरसंघचालक हा शूद्र, वैश्य, क्षत्रिय किंवा ब्राह्मण मधून निवडला जाणार नाही, तर केवळ हिंदू असणारा व्यक्तीच सरसंघचालक होईल. ST-ST असणारी हिंदू व्यक्ति सुद्धा सरसंघचालक होऊ शकते असे विधान मोहन भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी उत्सवात केले आहे.

Mumbai: सध्या मुंबईतील वरळी डोममध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) शताब्दी उत्सवाचा मनोमिलन कार्यक्रम सुरू आहे. संघाचे प्रमुख मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांनी स्पष्ट केले की, “संघटनेचे सर्वोच्च पद कोणत्याही जातीपुरते मर्यादित नाही, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) व इतर कुणीही व्यक्ति जर ती सर्वात योग्य असेल तर ती सरसंघचालक (Head) बनू शकते.
‘संघाच्या प्रवासाची १०० वर्षे’ असे या कार्यक्रमाचे शीर्षक होते, येथे बोलताना भागवत म्हणाले की, “ब्राह्मण असणे ही या पदासाठीची पात्रता नाही, त्याचप्रमाणे अनुसूचित जाती किंवा जमाती समुदायाचे असणे ही अपात्रता नाही. जो सर्वात योग्य आणि त्या वेळी उपलब्ध असेल, त्याची सरसंघचालक म्हणून नियुक्ती केली पाहिजे, तसेच प्रमुख व्यक्ती कोणत्याही जातीची असली तरी ती हिंदूच असली पाहिजे”. असेही त्यांनी नमूद केले. भागवत हे नेतृत्वाची निवड करण्यासंबंधीच्या प्रश्नांना आणि अटकळांना उत्तर देत होते.
आपल्या स्वतःच्या कार्यकाळाबद्दल बोलताना भागवत म्हणाले की, जेव्हा ते ७५ वर्षांचे झाले, तेव्हा त्यांनी संघटनेला याबद्दल माहिती दिली होती, परंतु त्यांना काम सुरू ठेवण्यास सांगण्यात आले. जेव्हाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मला पद सोडायला सांगेल, तेव्हा मी तसे करेन, मात्र कामातून कधीही निवृत्ती घेणार नाही, असे ते म्हणाले.
मोहन भागवत पुढे म्हणाले की, सरसंघचालक या पदासाठी निवडणूक होत नाही, सरसंघचालकांची नियुक्ती आरएसएसच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून केली जाते. प्रादेशिक आणि विभागीय प्रमुख त्यांची नियुक्ती करतात. नेतृत्व बदलाचा निर्णय योग्य वेळ आल्यावर ज्यांच्यावर जबाबदारी सोपवलेली असते त्यांच्याकडून घेतला जातो.
RSS ही ब्राह्मणांचे वर्चस्व असलेली संघटना आहे, या धारणेला संबोधित करताना भागवत म्हणाले की, “संघटनेची स्थापना ब्राह्मणबहुल परिसरातून झाल्याने ही धारणा लोकांमध्ये निर्माण झाली. ज्यामुळे सुरुवातीचे अनेक नेते ब्राह्मण समाजाचे होते. लोक आम्हाला ब्राह्मणांची संघटना म्हणायचे, आम्ही नकार दिल्यावरही ते आमच्यावर विश्वास ठेवत नव्हते, कारण लोक जे पाहतात त्यावरूनच आपलं मत ठरवतात. मात्र संघाने तेव्हापासून देशभरात विस्तार केला, आणि आजघडीला त्यात सर्व जाती, समुदायांचे प्रतिनिधित्व आहे.” असे ते म्हणाले.


[…] हे सुद्धा वाचा: RSS सरसंघचालक ST-ST सुद्धा होऊ शकतो, मात्र त… […]