bollywood-actor-ranveer-singh-receive-extortion-threat-via-whatsapp-voice-note
wp8299727
Bollywood Actor Ranveer Singh Receive Extortion Threat via Whatsapp Voice Note

मुंबई: अभिनेता रणवीर सिंह याला कोट्यवधी रुपये खंडणी देण्यासाठीची धमकी देण्यात आली आहे. रणवीर सिंहला व्हॉट्सअॅपवर व्हॉईस नोटद्वारे ही धमकी देण्यात आली असून त्याच्याकडून कोट्यवधी रुपयांची खंडणी मागितल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने कारवाई करत रणवीर सिंहच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली आहे.

मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या जुहू येथील घराबाहेर झालेल्या फायरिंग घटनेनंतर रणवीर सिंहला ही धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर व्हॉईस नोट पाठवत थेट धमकी देत मोठ्या रकमेची मागणी केली आहे. या धमकीनंतर रणवीर सिंगने तातडीने पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.

मुंबई पोलिस अॅक्शन मोडवर

रणवीर सिंहला आलेल्या धमकीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी त्वरित हालचाली सुरू केल्या. रणवीर सिंहच्या घराबाहेर अतिरिक्त सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. व्हॉईस नोट पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेल आणि गुन्हे शाखेची मदत घेतली जात आहे. पोलिसांकडून धमकीची गंभीरतेने चौकशी सुरू असून कॉल डिटेल्स आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.

रोहित शेट्टीच्या घरावरील गोळीबारीशी संबंध?

रणवीर सिंहला आलेली धमकी आणि रोहित शेट्टीच्या घराबाहेर झालेला गोळीबाराची घटना यांचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, रणवीर सिंह त्याची पत्नी दीपिका पादुकोण यांच्यासह त्याच्या कुटुंबाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. ही धमकी देणाऱ्या व्यक्तीला लवकरच अटक केली जाईल असंही पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.

लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव चर्चेत

कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगचं नाव घेऊन रणवीरला धमकी देण्यात आली आहे. व्हॉईस नोटवर ही धमकी देण्यात आली असून आता पोलिसांनी ही व्हॉईस नोट फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवली आहे. मुंबई पोलिसांचा सायबर सेल आणि गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत आहेत. व्हॉट्स अॅप नंबर आणि व्हॉईस सैंपल यांच्या मदतीने आरोपीचं ठिकाण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

रणवीर सिंग याचे बॉलीवूड करिअर

रणवीर सिंग हा सध्याच्या काळातील सर्वात मोठ्या आणि यशस्वी बॉलीवूड कलाकारांपैकी एक आहे. त्याचा शेवटचा रिलीज झालेल्या ‘धुरंधर’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी केली आहे. वृत्तानुसार, या चित्रपटाने जगभरात १३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई केली आहे.  ज्यामुळे रणवीरची स्टार पॉवर पुन्हा एकदा सिद्ध झाली. या चित्रपटानंतर त्याची लोकप्रियता वाढली आहे. दरम्यान धुरंधर चित्रपटाचा दुसरा भाग १९ मार्चला प्रदर्शित होणार आहे. याआधीच त्याला खंडणीसाठी धमकी देण्यात आली आहे.

रणवीर सिंहने आपल्या करियरची सुरुवात ‘बँड बाजा बारात’पासून केली होती. यानंतर त्याने ‘बाजीराव मस्तानी’, ‘पद्मावत’, ‘गली बॉय’,’ सिम्बा’, ‘८३’ आणि ‘रॉकी और रानी की प्रेम कहाणी’ सारख्या बड्या बॅनरच्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारली. त्याच्या अनोख्या शैली, उत्साह आणि दमदार अभिनयामुळे त्याने बॉलिवूडमध्ये एक खास ओळख निर्माण केली आहे.

One thought on “Ranveer Singh: बॉलीवूडचा धुरंधर रणवीर सिंहच्या जीवाला धोका; घराजवळील सुरक्षा वाढविली”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *