Ayatollah Ali Khamenei death claim after US-Israel attack on Iran amid escalating Middle East tensionsIsrael Iran War Live Updates: Israel has claimed that Iran's supreme leader Khamenei was killed in airstrikes.
Untitled design 20 1
Israel Iran War Live Updates: Israel has claimed that Iran’s supreme leader Khamenei was killed in airstrikes.

Israel Iran War Live Updates: इस्रायलअमेरिका यांनी संयुक्तपणे इराण वर केलेल्या हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते ‘अयातुल्ला अली खामेनी‘ (Ayatollah Ali Khamenei) यांचा मृत्यू झाल्याचा दावा रॉयटर्स या वृत्त संस्थेने आणि काही इस्रायली प्रसार माध्यमांनी केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असून, खामेनी यांच्या मृत्यूची बातमी खरी असल्याचे म्हटले आहे.

खामेनी यांच्या मृत्यूचा दावा इराणने फेटाळला

खामेनी यांच्या मृत्यूची बातमी मात्र इराणकडून फेटाळण्यात आली आहे. इराणमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने या बातम्यांना ‘इराणच्या शत्रूंनी केलेले मानसिक युद्ध’ (Mental Warfare) असे संबोधले आहे. इराणी वृत्तसंस्था तस्निम आणि मेहरने स्पष्ट केले की खामेनी पूर्णपणे सुरक्षित आहेत. तथापि, खामेनी यांचे नियोजित भाषण रद्द करण्यात आल्याची माहिती राज्य माध्यमांनी दिल्याने अटकळींना अधिकच उधाण आले आहे.

इराण चर्चेस तयार

दरम्यान, इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची (Abbas Araghchi) यांनी सांगितले की, इस्रायल किंवा अमेरिका तणाव कमी करण्यासाठी कोणतीही ठोस योजना सादर करणार असतील तर इराण चर्चेस तयार आहे. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी राजनैतिक पर्याय खुले असल्याचे संकेत दिले.

इराणचे प्रत्युत्तर

शनिवारी अमेरिका आणि इस्रायलने इराणमधील विविध ठिकाणी हल्ले केल्यानंतर परिस्थिती अधिकच चिघळली. या कारवायांमध्ये इराणी नेत्यांना लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात असून, इराणी सरकार पाडण्याचेही आवाहन करण्यात आले. प्रत्युत्तरादाखल इराणने इस्रायल तसेच अमेरिकेचे तळ असलेल्या आखाती देशांवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्रे डागली आहेत. यात कतार, युएई, कुवेत, बहरीन, जॉर्डन, सौदी अरेबिया आणि इराक यांचा समावेश आहे.

इराणी वृत्तानुसार, होर्मोज्गान प्रांतातील मिनाब शहरात ज्या ठिकाणी क्रांतिकारी गार्डचा तळ आहे, तेथील एका मुलींच्या शाळेवर झालेल्या हल्ल्यात किमान ५१ विद्यार्थिनी ठार झाल्या असून अनेक जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तीव्र संताप व्यक्त होत आहे.

अमेरिकेची भूमिका

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्यांचा उद्देश अमेरिकेच्या सुरक्षेला असलेला धोका दूर करणे आणि इराणला अण्वस्त्रे मिळविण्यापासून रोखणे हा असल्याचे स्पष्ट केले. त्यांनी इराणी सुरक्षा दलांना शस्त्रे खाली ठेवण्याचे आवाहन केले असून, बॉम्बस्फोट थांबल्यानंतर इराणच्या नागरिकांनी उठाव करावा असेही त्यांनी म्हटले आहे.

रशियाची भूमिका

रशियाने पश्चिमेकडील देशांनी इराणवर केलेल्या हल्ल्यावर तीव्र टीका केली आहे, त्यांनी याला ‘अकारण’ म्हणजे काहीही कारण नसतांना निर्माण केलेली स्थिति असे म्हटले आहे. तसेच यामुळे मध्य पूर्वेत ‘रेडिओलॉजिकल आपत्ती’ निर्माण होऊ शकते असे म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा: मोठी चूक झाली, रशियन महिलांशी संबंध होते..; एपस्टीन प्रकरणी बिल गेट्स यांची धक्कादायक कबुली व माफी..

दरम्यान, इराणने इस्रायल आणि अमेरिकेच्या आखाती मित्र राष्ट्रांवर क्षेपणास्त्र हल्ले करून जोरदार प्रत्युत्तर दिले असून, आवश्यक असल्यास आणखी कठोर कारवाई करण्याचा इशाराही दिला आहे. मध्यपूर्वेतील देशांमधील ही परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण असून पुढील घडामोडींवर संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

भारत, अमेरिका आणि इतर देशांच्या दूतावासांनी इराण आणि इस्रायलमधील त्यांच्या नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा: ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार

One thought on “Israel Iran War Live Updates: इराणचे प्रमुख ‘अयातुल्ला खामेनी’ यांचा मृत्यू; इस्रायलचा दावा..”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *