Iran warship IRIS Dena attacked by American submarine torpedo in Indian Ocean near Sri LankaIRIS Dena warship sinks in the Indian Ocean after alleged US submarine torpedo attack.
Untitled design 21
IRIS Dena warship sinks in the Indian Ocean after alleged US submarine torpedo attack.

American Submarine Attack On Iranian Ship ‘IRIS Dena’ Near Indian Ocean: हिंदी महासागरात भारतापासून 300 कि.मी. अंतरावर अमेरिकन पाणबुडीने इराणची युद्धनौका ‘आयरीस डेना’ (IRIS Dena) वर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात 80 जण ठार झाले असून अनेकजण बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. युद्धनौकेवर एकूण 130 जण असल्याचे समजते. जखमींना श्रीलंकेतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची यांचा अमेरिकेला इशारा

इराणचे परराष्ट्र मंत्री ‘सय्यदअब्बास अराक्ची‘ यांनी अमेरिकेला गंभीर इशारा देतांना म्हटले की, “अमेरिकेने इराणच्या किनाऱ्यापासून 2000 मैल दूर अंतरावर समुद्रात एक क्रूर कृत्य केले आहे. जवळपास 130 खलाशांना घेऊन जाणारे भारतीय नौदलाचे पाहुणे असलेले ‘फ्रीगेट डेना’ हे इराणचे युद्धजहाज कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय अमेरिकेने आंतरराष्ट्रीय पाण्यातील हद्दीत बुडवून टाकले. माझे शब्द लक्षात ठेवा, अमेरिकेला भविष्यात ह्या कृत्याबद्दल मोठा पश्चात्ताप होईल”

‘आयरिस डेना’ वरील हल्ल्याबाबत भारताची भूमिका

काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू आणि ‘मिलान २०२६’ या बहुराष्ट्रीय नौदल सरावात इराणची ‘आयरिस डेना’ ही युद्धनौका सहभागी झाली होती.

मात्र भारतीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, हा हल्ला इराणचे जहाज भारताच्या प्रादेशिक जलहद्दीच्या बाहेर गेल्यानंतर झाला. त्यामुळे या घटनेशी भारताचा थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच सरकारी सूत्रांनी सांगितले की, “इराणचे जहाज व त्यावरील कर्मचारी २५ फेब्रुवारीपर्यंतच भारताचे पाहुणे होते. त्यानंतर त्यांनी भारताकडून कोणतीही मदत मागितलेली नाही.”

अमेरिका-इराण संघर्ष अधिक तीव्र

अमेरिका आणि इस्रायलने मिळून आठवड्याच्या शेवटी इराणवर अचानक जोरदार हल्ला केला, यात इराणचे सर्वोच्च नेते ‘अयातुल्ला अली खामेनी’ यांची हत्या करण्यात आली. इराणने संबंधित देशांमधील अमेरिकन तळ आणि वाणिज्य दूतावासांना लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याने हा संघर्ष मध्य पूर्वेच्या इतर भागांमध्ये पसरला, ज्यामध्ये बहरीन, सौदी अरेबिया, कतार, कुवेत, ओमान आणि युएई यांचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा: इराणचे प्रमुख ‘अयातुल्ला खामेनी’ यांचा मृत्यू; इस्रायलचा दावा..

हे सुद्धा वाचा: मोठी चूक झाली, रशियन महिलांशी संबंध होते..; एपस्टीन प्रकरणी बिल गेट्स यांची धक्कादायक कबुली व माफी..

One thought on “American Submarine Attack On Iranian Ship ‘IRIS Dena’ Near Indian Ocean: हिंदी महासागरात इराणची ‘आयरिस डेना’ अमेरिकेने बुडवली, इराणचा अमेरिकेला गंभीर इशारा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *