Vasai fake baba Hrushikesh Vaidya rape and blackmail case Pune Manjari police investigationVasai fake godman Hrushikesh Vaidya booked for rape and blackmail; Pune connection under investigation.
Vasai fake baba Hrushikesh Vaidya rape and blackmail case Pune Manjari police investigation
Vasai fake godman Hrushikesh Vaidya booked for rape and blackmail; Pune connection under investigation. (Image- Lokfeeder)

वसई: स्वयंघोषित धर्मगुरू ‘ऋषिकेश वैद्य’ (Rishikesh Vaidya) याच्याविरोधात एका ३५ वर्षीय महिलेवर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “मी शंकर असून तू माझी पार्वती आहेस” असे सांगत महिलेच्या धार्मिक भावनांचा गैरफायदा घेत, तिची फसवणूक करून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही तक्रार वसईच्या ‘माणिकपूर पोलीस ठाण्यात’ नोंदवण्यात आली असून पुढील तपासासाठी प्रकरण पुण्यातील मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. (vasai fake baba rishikesh vaidya booked for rape)

अध्यात्माच्या नावाखाली फसवणूक आणि बलात्कार

पीडित महिला पुण्यातील रहिवासी असून, २०२३ मध्ये तिची ओळख फेसबुकच्या माध्यमातून आरोपी ऋषिकेश वैद्य याच्याशी झाली. ‘आमची वसई’ संस्थेचा प्रमुख असल्याचा दावा करणाऱ्या वैद्यने अध्यात्म शिकवण्याच्या बहाण्याने तिच्याशी जवळीक साधली. डिसेंबर २०२३ मध्ये तो पुण्यात आला आणि “मी महादेवाचा अवतार आहे, तू माझी पार्वती आहेस” असे सांगून तिला भुलवले. त्यानंतर आरोपीने तिला पुण्यातील मांजरी येथील एका लॉजमध्ये नेले, जिथे तिला गुंगी आणणारे पदार्थ देऊन तिच्यावर अत्याचार केला.

अश्लील फोटो काढून ब्लॅकमेल

या दरम्यान आरोपीने महिलेची अश्लील छायाचित्रे काढल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या छायाचित्रांच्या आधारे तिला सतत ब्लॅकमेल करण्यात आले आणि पुन्हा भेटण्यासाठी दबाव टाकण्यात आला. मे २०२५ मध्ये वसईतील ‘हॉटेल एक्सप्रेस इन’ मध्ये बोलावून तिच्यावर पुन्हा अत्याचार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.

अशोक खरात प्रकरणानंतर महिलेची तक्रार

दरम्यान, नाशिकमधील अशोक खरात प्रकरण उघड झाल्यानंतर पीडित महिलेला धैर्य मिळाले. तिने आपल्या पतीला सर्व प्रकार सांगितला आणि त्यानंतर वसईतील माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. बलात्काराची पहिली घटना पुण्यात घडल्यामुळे तपास मांजरी पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ‘हिरालाल जाधव’ यांनी दिली आहे.

अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा पोलिसांना संशय

तक्रारीनुसार, आरोपीने धर्मगुरू असल्याचे भासवून अनेक महिलांना जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

“फडणवीसांनी आरोपीचा सत्कार केला” – सपकाळ यांचा आरोप

या प्रकरणावरून राजकीय वातावरणही तापले आहे. हर्षवर्धन सपकाळ यांनी आरोप करत म्हटले आहे की, “देवेंद्र फडणवीस यांनी या आरोपीचा सत्कार केला होता. धर्माची शाल पांघरून आपले काळे कारनामे लपवणाऱ्या असल्या भोंदू बाबांबरोबर कोणाचे येवो न येवो पण मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फोटो पहिले समोर येतात, हे बरेच काही स्पष्ट करणारं आहे”.

धर्माच्या आड लपून गुन्हे करणाऱ्या भोंदू बाबांबाबत सरकारची भूमिका काय, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. अशोक खरात प्रकरणाप्रमाणेच या प्रकरणातही कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचे ट्विट

अशोक खरात नंतर आता या स्वयंघोषीत धर्मगुरू असलेल्या ऋषिकेश वैद्य ने महिलांवर केलेले अत्याचार समोर आले आहेत. जसा अशोक खरात “मी कृष्ण तू राधा” बोलून महिलांवर अत्याचार करत होता, त्याच प्रकारे “मी महादेव तू पार्वती” असे सांगत या भोंदू ऋषिकेश वैद्यने एका महिलेवर बलात्कार केला आहे. आज पोलिसांनी त्याला अटक केली. देवेंद्र पंतांनी या लिंगपिसाटाचा सत्कार केल्याचेही समोर येत आहे. धर्माची शाल पांघरून आपले काळे कारनामे लपवणाऱ्या असल्या भोंदू बाबांबरोबर कोणाचे येवो न येवो पण मूख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे फोटो पहिले समोर येतात, हे बरेच काही स्पष्ट करणारं आहे.

हे सुद्धा वाचा: Atrocities Act: अॅट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल; सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाठ यांची घोषणा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *