Trump Tariff Illegal declared by US Supreme Court under IEEPA 2026Trump Tariff Illegal declared by US Supreme Court under IEEPA 2026

Trump Tariff Illegal ठरवत अमेरिकेच्या सुप्रीम कोर्टाने ट्रम्प यांना मोठा झटका दिला आहे. या ऐतिहासिक निर्णयामुळे अमेरिकेचे व्यापार धोरण, जागतिक व्यापार तसेच जगातील राजकीय संबंधांवर याचा मोठा परिणाम होणार आहे.

Untitled design 16
Trump Tariff Illegal: अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा ट्रम्प प्रशासनाला मोठा दणका.

Trump Tariff Illegal असा ऐतिहासिक निकाल देत अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court of the United States) ने अमेरिका राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांच्या व्यापक टॅरिफ धोरणाला मोठा धक्का दिला आहे. न्यायालयाने 6-3 अश्या बहुमताने दिलेल्या या निर्णयात स्पष्ट केले की, ‘1977 च्या International Emergency Economic Powers Act (IEEPA) अंतर्गत राष्ट्राध्यक्षांना सर्व देशांवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लावण्याचा अधिकार नाही.’ या निकालामुळे अमेरिकेच्या व्यापार धोरणात आणि जागतिक बाजारात मोठी खळबळ उडाली आहे.

ट्रम्पचे टॅरिफ धोरण काय होते?

ट्रम्प यांनी 1977 च्या International Emergency Economic Powers Act (IEEPA) अंतर्गत इतर देशांवर टॅरिफ लावले होते. ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात ‘रिसिप्रोकल टॅरिफ’ची घोषणा करत जवळपास सर्व देशांमधून आयात होणाऱ्या वस्तूंवर 10 टक्के बेसलाइन टॅरिफ लावले होते. चीन, कॅनडा आणि मेक्सिकोसारख्या देशांवर अधिक दर आकारण्यात आले होते. 2 एप्रिल 2025 रोजी ‘लिबरेशन डे’ च्या दिवशी हा निर्णय जाहीर करण्यात आला होता.

ट्रम्प प्रशासनाने दावा केला होता की अमेरिकेची वाढती व्यापार तूट, फेंटेनिलसारख्या अमली पदार्थांची तस्करी आणि राष्ट्रीय सुरक्षेचे प्रश्न हे राष्ट्रीय आणीबाणी स्थितीचे कारण आहेत. त्यामुळे IEEPA अंतर्गत टॅरिफ लावणे कायदेशीर असल्याचे सांगण्यात आले होते.

US सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्पचे टॅरिफ धोरण बेकायदेशीर का ठरविले?

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की ‘IEEPA हा कायदा आणीबाणीच्या परिस्थितीत आर्थिक शक्ती देण्यासंबंधी आहे, तो व्यापक स्वरूपात इतर देशांवर टॅरिफ लागू करण्यासाठी नाही. अमेरिकन संविधानानुसार कर आणि टॅरिफ लावण्याचा अधिकार काँग्रेसकडे आहे, राष्ट्राध्यक्षांकडे नाही. तसेच ही कृती करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कॉँग्रेसकडून कोणतीही मंजूरी घेतल्याचे दिसत नाही. ‘

मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स (John Roberts) यांनी हा महत्वपूर्ण निकाल देतांना ‘मेजर क्वेश्चन्स डॉक्ट्रिन’ (Major Questions Doctrine) चा आधार घेतला. या डॉक्ट्रिन चे स्वरूप असे आहे की, जर एखाद्या निर्णयामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक व राजकीय परिणाम होणार असतील तर असे धोरण राबवितांना काँग्रेसची स्पष्ट मंजुरी आवश्यक असते.

कुणी दिले होते आव्हान?

या प्रकरणात 12 अमेरिकी राज्ये आणि टॅरिफ मुळे प्रभावित झालेल्या काही व्यावसायिक संस्थांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. ट्रम्प हे टॅरिफ धोरणाचा एकतर्फी वापर करत आहे. तसेच या कायद्याचा यापूर्वी असा गैरवापर कधीही झाला नाही, अशी तक्रार या 12 अमेरिकी राज्यांनी न्यायालयाकडे केली होती. तसेच काँग्रेसची मंजुरी न घेता IEEPA कायद्याचा वापर करून टॅरिफ लावणे घटनाबाह्य असल्याचा दावा करण्यात आला होता आणि न्यायालयाने सुद्धा हेच मत मान्य केले.

अमेरिकन अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होणार?

Trump Tariff Illegal ठरल्यामुळे अमेरिकन आयात-निर्यात धोरणात बदल होण्याची शक्यता आहे. टॅरिफ हे ट्रम्प यांच्या आर्थिक आणि परराष्ट्र धोरणातील प्रमुख साधन होते. या शुल्कांमुळे काही उद्योगांना संरक्षण मिळाले, मात्र अनेक सहयोगी देश नाराज झाले होते. या निर्णयानंतर जागतिक बाजारपेठेत अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता आहे. डॉलरची स्थिती, शेअर बाजार आणि आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांवर याचा परिणाम होऊ शकतो.

आयातदारांना अब्जावधी डॉलर्स परत मिळणार?

या ऐतिहासिक निर्णयामुळे ट्रम्प प्रशासनासमोर मोठे आर्थिक संकट उभे ठाकले आहे. ज्या आयातदारांनी गेल्या काही काळात ‘IEEPA’ अंतर्गत अवाढव्य शुल्क भरले होते, त्यांना आता अब्जावधी डॉलर्सचा परतावा (Refund) द्यावा लागू शकतो. जरी अनेक कंपन्यांनी हा कराचा भार ग्राहकांवर टाकला असला, तरी तांत्रिकदृष्ट्या सरकारला ही रक्कम परत करावी लागेल.

ट्रम्प पुढे काय करू शकतात?

ट्रम्प प्रशासन इतर कायदेशीर तरतुदींचा आधार घेत काही टॅरिफ कायम ठेवण्याचा प्रयत्न करू शकते. राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा किंवा अन्यायकारक व्यापार पद्धतींविरोधातील कायद्यांचा वापर केला जाऊ शकतो. मात्र IEEPA चा वापर करून व्यापक टॅरिफ लावण्याचा मार्ग आता बंद झाला आहे.

या निर्णयाची अधिकृत माहिती कुठे मिळेल?

या ऐतिहासिक निकालाबाबत अधिकृत माहिती आणि तपशील अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेत:
https://www.supremecourt.gov/

हे सुद्धा वाचा..चीनचा रोबोट भारतीय विद्यापीठाने स्वतःचा आविष्कार म्हणून दाखविला, जागतिक नामुष्की नंतर विद्यापीठाची AI समिट मधून हकालपट्टी – Lokfeeder News

हे सुद्धा वाचा..राज ठाकरेंची मोहन भागवतांवर टीका, “आम्हाला ज्ञानामृत पाजू नका, अगोदर..” – Lokfeeder News

3 thoughts on “Trump Tariff Illegal: ट्रम्पच्या टॅरिफ धोरणाला अमेरिकन सुप्रीम कोर्टाचा मोठा झटका, अब्जावधी डॉलर्स परत करावे लागणार”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *